*कोंकण Express*
*4 मार्च 2024 सोमवार रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन*
रोजगाराच्या शोधातील युवक युवती व नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, कणकवली कॉलेज कणकवली, ITI फोंडाघाट, देवगड, वैभववाडी व BTRI सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करत आहे भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा. दि. 04 मार्च 2024 सोमवार रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे दहावी, बारावी, ITI, पदवीधर, नर्सिंग, बॅकिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरींग, ॲग्रिकल्चर, शिक्षक यासारख्या विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकरिता 400 पेक्षा जास्त पदांची व रुपये 10 हजार ते 25 हजार इतक्या वेतनाच्या रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
उमेदवारांनी रोजगार मेळावा सहभागासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळा वरुन नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय, सिंधुदुर्ग व कणकवली कॉलेज कणकवली यांचेशी संपर्क साधावा.