*कोकण Express*
*माजी खास. निलेश राणे यांचे जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार : नगराध्यक्ष संजू परब*
रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे उद्या गुरुवार दि.२८ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. या निमित्त जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व भाजपचे लोकसभा मतदार संघ सचिव विशाल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाचे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांचे गुरुवारी सकाळी गोव्यातून आगमन होणार असून सकाळी ९ वाजता बांदा, ९.१५ वाजता, इन्सूली खामदेव नाका, १० वाजता सावंतवाडी शहर कार्यालय, १०.३० वाजता कुडाळ व ११ वाजता कणकवली येथे भव्य स्वागत होणार आहे. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी संजू परब यांनी केले आहे. माजी खासदार नीलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार आहे.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली हे स्वागत होईल असे ते म्हणाले.