मराठी भाषा गौरव दिनी माणदेशी कवी अशोक बाबर यांचे विद्यामंदीर येथे मार्गदर्शन

मराठी भाषा गौरव दिनी माणदेशी कवी अशोक बाबर यांचे विद्यामंदीर येथे मार्गदर्शन

*कोंकण Express*

*मराठी भाषा गौरव दिनी माणदेशी कवी अशोक बाबर यांचे विद्यामंदीर येथे मार्गदर्शन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी विभागामार्फत मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा केला गेला . यावेळी प्रशालेतील विद्यार्थांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संत वाङ्मयातील ज्ञानेश्वर चरित्रावर आधारित एकपात्री प्रयोग सादर केले मराठी नाट्यछटा सादर केल्या तसेच मराठी भाषेची स्फूर्ती गीते आणि लोकगीते सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली . यावेळी प्रशालेच्या संगीत विभागाने वाद्यांची साथ देवून कार्यक्रम उठावदार बनविला . मराठी भाषा गौरव दिनासाठी प्रख्यात माणदेशी कवी प्राध्यापक अशोक बाबर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वय वर्षे ८६ असूनही नवतरुणाला लाजवील असे अमोघ आणि लाघवी वाणीत कविवर्य कुसुमाग्रजाच्या वाङ्मयीन व्यक्तीमत्वाचा शोध घेतला . माणदेशातील कलेढोण या खेड्यात बाबर सरांचा जन्म झाला ग्रामीण संस्कारांनी सरांचे मन समृद्ध झाले होते . स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ सरांनी जवळून अनुभवला होता गीतरामायनकार ग . दि . माडगूळकर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांचा जवळून सहवास लाभला होता . ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांचा सहवास लाभल्यामुळे बाबर सरांनी कुसुमाग्रज यांच्या जीवन लहरी ‘विशाखा ‘ मुक्तायन नटसम्राट इ .कलाकृतींचा संदर्भदेत व्याख्यानाला आकार दिला . प्रा . बाबर सर शास्त्र शाखेचे विद्यार्थी भौतिक शास्त्रांचा अध्यापक आयुष्यभर भौतिकशास्त्र . जगले आणि अकरा संदर्भ ग्रंथ भौतिकशास्त्र या विषयांचे तयार केले . वयाच्या ऐंशी वर्षानंतर मराठी भाषेच्या प्रेमामुळे १४ काव्यसंग्रह लिहिले . गरुड झेप आणि स्वरायन हे त्यांचे गाजलेले काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत सरांच्या मार्गदर्शनाने विद्यामंदिर प्रशालेचा सर्व परिसर मराठी भाषेच्या गौरवात मंत्रमुग्ध झाला . या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ पी जे कांबळे सर यांनी माणदेशी माणसं आणि मराठी लेखक यांचा समन्वय साधत मराठी भाषा लोकसंस्कृतीने कशी जपली या विषयी मार्गदर्शन केले जेष्ठ शिक्षक श्री वणवे सरांनी मराठी भाषा आणि आजची शिक्षण पद्धती या विषयी विचार प्रकट केले विषय तज्ञ सचिन तांबे सरांनी मराठी शब्द आणि इंग्लिश शब्दांची भाषेतील भेसळ या विषयी विचार व्यक्त केले . पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम श्री संदिप कदम यांनी मराठी भाषेची संमृद्धी विषयी विचार मांडले या कार्यक्रमांचे प्रास्ताविक सौ . सावंत मॅडम यांनी केले . सुत्रसंचालन आणि आभार विद्यार्थीवर्गाने केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!