कासार्डे केंद्रावर एच. एस. सी. बोर्डाची परिक्षा अगदी उत्साहात सुरू

कासार्डे केंद्रावर एच. एस. सी. बोर्डाची परिक्षा अगदी उत्साहात सुरू

*कोंकण Express*

*कासार्डे केंद्रावर एच. एस. सी. बोर्डाची परिक्षा अगदी उत्साहात सुरू*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील अगदी हायवे लगत असलेल्या कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे एच. एस. सी. बोर्डाची परीक्षा अगदी उत्साहात सुरू असून या परीक्षा केंद्रावर जवळ जवळ 415 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. कासार्डे केंद्राचा क्रमांक 0881 असा असून अविनाश शिवराम मांजरेकर हे केंद्र संचालक म्हणून कठोर भूमिका बजावत आहेत. शिवाय केंद्रावर कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी ते सातत्याने घेत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी कासार्डे विद्यालयाचे अनिल नलवडे हे सह केंद्रसंचालक म्हणून भूमिका पार पाडत आहेत. तर दिवाकर पवार हे स्टेशनरी सुपरवायझर चे काम पाहत आहेत. पहिल्याच दिवशी परीक्षार्थी प्रतिनिधी म्हणून दिव्यांग विद्यार्थिनी कासार्डे ज्युनिअर कॉलेजची कुमारी अक्षता जाधव हिचे पुष्प देऊन कासार्डे विद्यालयाचे शिक्षण समितीचे चेअरमन अरविंद कुडतरकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य एम. डी खाडे ,केंद्र संचालक अविनाश मांजरेकर, कासार्डे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एन .सी. कुचेकर ,प्रभारी पर्यवेक्षक एस डी. भोसले सह केंद्रसंचालक अनिल नलावडे आदी उपस्थित होते .कासार्डे केंद्रावरती तळेरे, फणसगाव, कासार्डे, मालणकर कॉलेज तळेरे व मूटाट, येथून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये भविष्यातील स्वप्न साकार करण्याचे ध्येय दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!