*कोंकण Express*
*मनसेचा बालमहोत्सव 2024 उत्साहात संपन्न*
*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग, स्वस्तिक प्रतिष्ठान आणि धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव 2024 दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण भवन एमआयडीसी येथे संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिरीष सावंत कोकण नेते मनसे ,प्रदीप माने उद्योजक शशांक आटक शिक्षक प्रतिनिधी, नितीन शिरसाट उद्योजक ,शशांक पिंगुळकर ग्रामपंचायत सदस्य, गुरुदास गवंडे सौ नालंदा काजरेकर मॅडम, बाळा पावसकर, हेमंत जाधव ,बाबाजी भोई यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्पर्धा दोन गटात संपन्न झाली पहिली ते पाचवी लहानट इयत्ता सहावी ते दहावी मोठा गट स्पर्धा पुढील प्रमाणे संपन्न झाल्या
▪️वकृत्व स्पर्धा लहान गट, वकृत्व स्पर्धा मोठा गट, चित्रकला स्पर्धा मोठा गट, एकपात्री अभिनय स्पर्धा लहान गट, एक पात्री अभिनय स्पर्धा मोठा गट ,ज्ञानी मी होणार लहान गट अशा स्पर्धा घेण्यात आल्या ..
विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे.
वकृत्व स्पर्धा (लहान गट) प्रथम क्रमांक – कु. मिहीर प्रफुल्ल वाडेकर.
द्वितीय क्रमांक- कुमार सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर तृतीय क्रमांक -सार्थक महेश मुणनकर
▪️वकृत्व स्पर्धा (मोठा गट) प्रथम क्रमांक- श्रावणी राजन आरावांदेकर
द्वितीय क्रमांक-गायत्री गणेश जोशी तृतीय क्रमांक – निधी अजय कुशे.
▪️एकपात्री अभिनय (लहान गट )
प्रथम क्रमांक- सर्वज्ञ वराडकर
द्वितीय क्रमांक- नुपूर खंदारे
तृतीय क्रमांक- पूर्वा अहिर
▪️एकपात्री अभिनय (मोठा गट) प्रथम क्रमांक- अनुष्का सुरज कुडपकर
द्वितीय क्रमांक- दिव्या विष्णू बाणे
तृतीय क्रमांक- श्रमिका राजन आरोंदेकर
▪️चित्रकला (मोठा गट)
प्रथम क्रमांक- राशी सातोसे
द्वितीय क्रमांक- तन्वी धनंजय डीचोलकर
तृतीय क्रमांक- अंजली नरेश पटेल
▪️ज्ञानी मी होणार
प्रथम क्रमांक- ॠणाल किरण सावंत (कांदोळी नंबर 1)
रुजी रामचंद्र वरक (कांदोळी न’1)
▪️द्वितीय क्रमांक- अदीश्री अर्जुन परब. (कुडाळ कुंभारवाडा)
देवर्षी सत्यवान मेस्त्री.( कुडळ कुंभारवाडा)
या स्पर्धा मधे प्ररिक्षक म्हणुन श्री अरुण मार्गज ,नितीन बांबार्डेकर, प्रणाली मायेकर, मंदार जोशी, शांभवी मॅडम, शंकर माधव , शुभम करंगळे मॅडम, प्रसाद कानडे, विनायक हारगे, विलास गोठोसकर, सुधीर सावंत, सचिन गुंडे यांनी परीक्षण केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या भेटी झाल्या या मधे अॅड. अनिल केसरकर, सुधीर राऊळ, साहिल तळकटकर, मिलिंद सावंत,चित्त् रंजन सावंत,छोटु सावंत, ओमकार वालावलकर. या महोत्सवा 327 मुलांचा सहभाग घेतला आयोजकांतर्फे पालकांची मुलांची दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळच्या सत्रात बॅ. नाथ पै विद्यालय यांचा पन्नास कलाकारांच्या संचात महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाने महोत्सवात रंगत आणली यावेळी पालक शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. महोत्सव च्या आयोजनाबाबत पालक व शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले .महोत्सवाची सांगता पक्षीस वितरणाने करण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजू साटम सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष मनसे , व गुरुदास गवंडे सौ दिपाली काजरेकर मॅडम , सौ. गवंडे मॅडम उपस्थित होते. या प्रसंगी भव्य जागा परिसर उपलब्ध करून त्याबद्दल बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य सुशांत परब, अभी गोवेकर, शशांक पिगुळकर, आनंद गावंडे ,सुबोध परब,अमित कुराडे, चेतन राऊळ,जगन्नाथ गावडे, विनीतपरब, अभय पाटील, प्रथमेश धुरी, दिलीप तांबे ,गौरव मोडक, योगेश राऊळ, योगेश .लाड, महादेव आगलावे, समीर नाईक, वेदांत कुडतरकर, महेश रावले, हर्षित पालव, राजू माने बाबाजी भोईसर यांनी विशेष सहकार्य केले.