*कोकण Express*
*चिल्लर लोकांच्या वक्तव्याची आम्ही दखल घेत नाही त्यांना उत्तर द्यायला आमचे कार्यकर्ते सक्षम..*
*जे पक्ष सोडून गेले आहेत ते आता पस्तावले बुडणाऱ्या जहाजात कोणीही बसत नाही*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमच्यावर आरोप करणाऱ्या चिल्लर लोकांची आम्ही दखल घेत नाही. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्यायला आमचे खालचे कार्यकर्ते सक्षम आहेत. तसेच भाजी मार्केट बाबत आमच्या कार्यालयातील कर्मचारी देखील त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करू शकतात ते त्यांनी घ्यावे असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज लगावला.
ओसरगाव येथील महिला भवन मध्ये आज जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीबाबत ची माहिती श्री तेली यांनी आज येथील भाजप कार्यालयात दिली. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केलेल्या आरोपाबाबत तेली यांना प्रश्न विचारला असता अशा चिल्लर लोकांच्या वक्तव्याची आम्ही दखल घेत नाही त्यांना उत्तर द्यायला आमचे खालचे कार्यकर्ते सक्षम आहेत. भाजी मार्केट हा मोठा प्रकल्प आहे त्याबाबत त्यांना मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या ग्लोबल असोसिएट कार्यालयातील कर्मचारीही ते करू शकतात असे ते म्हणाले.
दरम्यान नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते सुशांत नाईक यांनी कणकवली नगराध्यक्षांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यावर बोलताना श्री तेली यांनी आमचा एकही कार्यकर्ता बाहेर जाणार नाही. जे पक्ष सोडून गेले आहेत ते आता पस्तावले आहेत. बुडणाऱ्या जहाजात कोणीही जात नाही. त्यामुळे आमच्या पक्षाचा एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही असा ह राजन तेली यांनी केला.