*कोंकण Express*
*रिल्स व मिम्स कोकण सन्मान २०२४ स्पर्धात शुभम राऊत,बंटी कांबळी विजेता*
*आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते आयोजित*
*पहिल्या रिल्स व मिम्स स्पर्धेचे शानदार सोहळ्यात झाले बक्षीस वितरण*
*सहभागी झालेल्या युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स चा केला सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रिल्स व मिम्स कोकण सन्मान स्पर्धा २०२४ च्या स्पर्धेत
शुभम राऊत यांच्या रिल्स तर बंटी कांबळी यांच्या हापूस गॅंग च्या मिम्स ला प्रथम विजेता पुरस्कार प्राप्त झाला. कोकणातील असंख्य युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स नी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कणकवली येथे हॉटेल नीलम कंट्री साईटच्या गार्डनवर भव्य अशा सोहळ्यात संपन्न झाला. विजय त्यांना आमदार नितेश राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आणि उत्तेजणार्थ ठरलेल्या सर्व स्पर्धकांचा सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. या lस्पर्धेतील सन्मानित करण्यात आलेल्या क्रियेटर्स मधील
समाधान जाधव ,बायग्या
नील मस्त्री,जन्म कोकणातला,प्रज्ञा , मालवणी स्टॅग,मंदार शेट्ये , कोकणकर ,निधी वारंग,कोकणी पोरग्या,सावी मुद्राळे,येवा कोकण आपलाच आसा, सिद्धेश,
अनिकेत रासम,लक्की कांबळी,रीलस मालवणी,,ग्रुप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सिद्धश
आम्ही क्रियेटर्स नी घेतलेल्या मेहनतीची दाखल कोण घेणार अशी कधीच कल्पना नव्हती.मात्र ती आमदार नितेश राणे यांनी घेतली.कोकण सन्मान म्हणजे आमच्यासाठी फार मोठे बक्षीस आहे अशी प्रतिक्रिया लकी कांबळे यांनी दिली.
यावेळी योगेश आणि योगेंद्र साटम पोलीस बंधूंचाही सत्कार करण्यात आला.