ठाकरे मुख्यमंत्री असताना पदे दिली तेव्हा डाके साहेब,चंदू मास्त यांची कुटुंब आठवले नाही, चतुर्वेदी आठवली

ठाकरे मुख्यमंत्री असताना पदे दिली तेव्हा डाके साहेब,चंदू मास्त यांची कुटुंब आठवले नाही, चतुर्वेदी आठवली

*कोंकण Express*

*ठाकरे मुख्यमंत्री असताना पदे दिली तेव्हा डाके साहेब,चंदू मास्त यांची कुटुंब आठवले नाही, चतुर्वेदी आठवली*

*आमदार नितेश राणे यांचा उबाठा वर घणाघात*

*उबाठा म्हणजे शरद पवारांची “बी” टीम*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्यावर बाहेरून आलेल्यांना पद देता असा आरोप व मुक्ता फळ संजय राऊत उधळत आहेत.त्या राऊत चा मालक उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती कडवड शिवसैनिकांना पद दिली होती ? जेव्हा खासदारकी,आमदारकी ,सिद्धिविनायक मंदिर, साई बाबा मंदिर ट्रस्ट चे अध्यक्षपद द्यायची वेळ आली तेव्हा डाके साहेब,चंदू मास्त यांच्या सारख्या निष्ठावंत अनेक शिवसैनिकांची कुटुंब आठवली नाही.तेव्हा चतुर्वेदी आठवली.बाहेरचे लोकच त्या पदांवर बसविला.आता संजय राऊत जे बोलतात ते कोणत्या तोंडाने बोलत आहेत असा घणाघात भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना केला.
स्वतःच ठेवायचं राखून व दुसऱ्याच बघायचं वाकून ह्याच उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे व त्याचा पक्ष आहे.उद्धव ठाकरेंच दुकान आता बंद झाल आहे. हे उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे सगळे भाजपात प्रवेश करत आहेत.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर फोन लावला तेव्हा उद्धव ठाकरेंनी फोन घेतला नाही. त्यांचा अपमान केला अशी आमच्या जवळ माहिती आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना तासनतास बसवून ठेवले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब या लोकांना महत्वाचे वाटत नाहीत.त्यांचा हे नेहमी अपमान केताले आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
उबाठा पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी झाली. उबाठा म्हणजे शरद पवारांची बी टीम झाली आहे.अशा संपवलेल्यानी भाजपा संपवण्याची भाषा करू नये असे निलेश राणे यांनी राऊत यांना सूनालवले.
भाजपा ही भारताची ओळख झाली आहे. भारताचा अभिमान टिकवून ठेवणारा एकमेव पक्ष आहे. जे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यांच्या पक्षात डावललजात असेल तर त्यांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी भाजपात याव हे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी विधान केले असेल तर ते योग्य आदेश दिले आहेत.
आमच्या पोलीस पत्नी ह्या आमच्या भगिनी आहेत. त्यांना मी खुल पत्र देईन ते वाचल्यानंतर त्यांचं मत नक्की बदलेल. असे एका प्रश्नांवर ते म्हणाले.
जिल्ह्यात सापडलेले बांगलादेशी इथे आले कसे त्यांच्या पर्यँत पोचण्याचे काम पोलीसांनी करावे.पोलिसांनी बांगलादेशी,रोहींगे यांना पकडले ही कारवाई केली त्यांचे अभिनंदन करतो मात्र या घटनेच्या मुलाशी जावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!