सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी झपाटलेल्या डॉ.जाधवसाहेबांचा दुर्दैवी अंत जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान-श्री.वामन तर्फे

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी झपाटलेल्या डॉ.जाधवसाहेबांचा दुर्दैवी अंत जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान-श्री.वामन तर्फे

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी झपाटलेल्या डॉ.जाधवसाहेबांचा दुर्दैवी अंत जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान-श्री.वामन तर्फे*

*सिंधुदुर्ग*

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी सातत्याने झटत राहणारे कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ. जाधवसाहेब यांचे आज गोवा येथे उपचारा दरम्यान ह्रदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले.साहेबांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून अतिव दु: ख झाल्याची भावना सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे, सचिव श्री गुरुदास कुसगांवकर सर्व पदाधिकारी व सर्व मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जाधव साहेबांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले होते.कोविडच्या काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी विविध वेबिनारच्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रोत्साहन देण्याचे उल्लेखनीय काम साहेबांनी केले होते.नवीन शैक्षणिक धोरणाबाबत साहेबांचा गाढा अभ्यास होता.साहेबांचे शैक्षणिक विचार उच्चप्रतिचे होते.आपल्या मधुर भाषेने व वक्तृत्वावरील प्रभावामुळे व प्रशासनावरील उत्तम नियंत्रणामुळे जाधव साहेब सर्वांना मनात घर निर्माण करुन गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.साहेबांच्या अकाली जाण्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.शिक्षणक्षेत्रातील एका तपस्वी विचारवंतांच्या अकाली जाण्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांवर शोककळा पसरली आहे.सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अशा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी झपाटलेल्या कर्तव्यदक्ष शिक्षणतपस्वींला सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!