*कोंकण Express*
*श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय व प्रशालेचे माझी विद्यार्थी आणि समाजसेवक श्री अब्दुल रशीद शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्र तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचे आयोजन*
*कणःकवली प्रतिनिधी*
श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड प्रशालेचे माझी विद्यार्थी आणि समाजसेवक श्री अब्दुल रशीद शेख सर (मुंबई) यांच्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या सौजन्याने आज रविवार दिनांक 25-02-2024 रोजी सकाळी 9 वाजता श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड मध्ये विद्यार्थी आणि त्यांचे इच्छुक पालक यांचे मोफत कॉम्पुटर द्वारे नेत्र तपासणी शिबिर आणि दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ मंडळींनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.