सौ गावडे यांची टीका म्हणजे अभ्यासाविना केलेली वायफळ बडबड

सौ गावडे यांची टीका म्हणजे अभ्यासाविना केलेली वायफळ बडबड

*कोकण Express*

*सौ गावडे यांची टीका म्हणजे अभ्यासाविना केलेली वायफळ बडबड*

*रोणापाल सरपंच योगिता केणी*

जे माझ्या विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत टिकू शकले नाहीत त्यांनी एखाद्याचा मोहरा बनून माझ्यावर टीका करणे म्हणजे हास्यास्पद आहे.त्यांनी केलेले उपोषण म्हणजे प्रशासनाबाबत चे त्यांचे अज्ञान होय. तसेच जर देवस्थान मानकरी माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी त्यांच्या काळात गावचा विकास केला होता आणि त्यांचे समाजकार्य मोठे होते तर त्यांच्याच घरातिल असून सुद्धा तुम्हाला लोकांनी का नाकारले याचे आत्मपरीक्षण करावे त्यानंतरच माझे समाजकार्य विचारावे .तसेच मी केलेली टीका अयोग्य होती तर माजी सरपंच गावडे यांनी प्रत्युत्तर देणे आवश्यक होते परंतु टीका योग्यच असल्याने त्यांना ते जमले नाही म्हणून त्यांनी तुमच्या सारखा मोहरा पुढे करून माझ्यावर हास्यास्पद वाटावी अशी टीका करून स्वतः अकार्यक्षम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे सोनाली गावडे या दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन माझ्या वर बोलत असतील तर त्यानी स्वतःच रंगपटलावरील कळसुत्री बाहुली असल्याचे सिद्ध केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!