*कोंकण Express*
*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे “कळी उमलताना” चे मार्गदर्शन संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
त्रिमूर्ती विकास मंडळ,मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण येथे रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या वतीने एम एच एम आणि अस्मिता प्रोजेक्ट अंतर्गत कळी उमलताना हा उपक्रम राबविला.या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन,या वयात घेण्याची काळजी , आवश्यक असणारी माहिती,किशोरवयीन मुलींना सज्ञान करणे, किशोरवयीन मुलींना उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ.अश्विनी नवरे मॅडम यांनी उत्कृष्ट सविस्तर माहिती दिली. किशोरवयीन मुलींच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करून भीती दूर करण्यासाठी मॅडमनी मातेच्या भावनेने त्यांच्याशी संवाद साधला व मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.तसेच किशोरवयात उद्भवणाऱ्या अनेक आजारांबाबत माहिती दिली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.शंकर परब, डॉ.अश्विनी नवरे,रोटरियन श्री.दिनेश राठोड कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा रोटेरियन सौ.मेघा गांगण,सौ.लीना काळसेकर, सौ.संध्या पोरे,सौ.उमा परब, श्रीमती वैयजंयती मुसळे इत्यादी रोटरियन उपस्थित होते.तसेच शालेय समिती सदस्य श्री.संतोष गांवकर उपस्थित होते.यावेळी रोटरी क्लब कणकवली अध्यक्ष श्री.शंकर परब व माजी सेक्रेटरी फर्स्ट लेडी रोटरियन सौ.उमा परब यांच्या आर्थिक सहाय्यातून हायस्कूलला वाॅटर फिल्टर प्रदान करण्यात आला.तसेच रोटरीच्या वतीने सॅनिटरी पॅड व अस्मिता पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.व्हा डी काणेकर यांनी केले.यावेळी प्रशालेतील शिक्षिका श्रीमती प्रणीता गांवकर आणि श्रीमती सानिका बाक्रे , शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉ.विद्याधर तायशेटे आणि रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे अध्यक्ष यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी त्यांचे संस्था व शाळेच्या वतीने विशेष आभार मानले.