*कोंकण Express*
*ऊस लागवड वेळेत झाल्यास निश्चित उत्पादनात वाढ – डॉ. विजय शेट्ये*
*सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चा आयोजित ग्राम परिक्रमा यात्रेचा कुसूर येथे शुभारंभ*
*वैभववाडी । प्रतिनिधी*
सद्यस्थितीत तळकोकणातील ऊस उत्पादकांचे एकरी उत्पन्न फारच कमी आहे. ऊस लागवड वेळेवरती नाही हे देखील त्याचे कारण आहे. अशा पद्धतीची शेती ही परवडणारी नाही. एकरी चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतीत योग्य नियोजन असले पाहिजे. असे प्रतिपादन ऊस उत्पादक तज्ञ डॉ. विजय शेटये यांनी केले.
कुसूर येथे भाजपा किसान मोर्चा आयोजित ग्राम परिक्रमा यात्रेचा शुभारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, प्रदेश उपाध्यक्ष भाई बांदकर, मंडळ अध्यक्ष नासीर काझी, पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे, माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, श्री सोमन, नगराध्यक्षा नेहा माईणकर, अमृत चौगुले, सुधीर नकाशे, प्राची तावडे, यामिनी वळवी, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश संसारे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अवधूत नारकर, उदय सावंत, राजू माळवदे, प्रदीप जैतापकर, श्री नाटेकर, श्री पळसुले, उपस्थित होते,
यावेळी शेटये म्हणाले, कोकणात तग धरणारी जात आपण शोधली पाहिजे. ८६०३२ या जातीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. मात्र ९२००५ ही सध्या फायदेशीर आहे. सेंद्रिय पदार्थाचा जमिनीत वापर होणे गरजेचे आहे, तसेच माती परीक्षण वेळेत झाले पाहिजे, तणनाशकाचा आवश्यक त्या प्रमाणात वापर झाला पाहिजे असे यावेळी शेटये यांनी सांगितले.
भाई बांदकर म्हणाले, मार्केटिंग आपण शिकले पाहिजे. बन्याच शेतकन्यांची मुले मुंबईच्या ठिकाणी आठ ते दहा हजाराच्या नोकन्या करत आहेत. त्यांना गावी बोलवून त्यांना शेतीची आवड करून दिली पाहिजे असे सांगितले. यावेळी उमेश सावंत, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, प्राची तावडे, श्री ताम्हणकर यांनी मार्गदर्शन केले. पणन महासंघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रमोद रावराणे यांचा सत्कार करण्यात आला. ड्रोनदीदी म्हणून नुकतीच निवड झालेल्या प्राची तावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन समितीवर सुधीर नकाशे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रगतशील शेतकरी रवींद्र गावडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. ओले काजू विक्रीचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष यांनी महेश संसार यांचे अभिनंदन केले. कृषी सल्लागार विवेक कदम यांनी शेतकऱ्यांना काजू पिका बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या परिक्रमा यात्रेचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश संसारे यांनी केले.

