*कोंकण Express*
*भटके कुत्रे, आठवडा बाजारातील योग्य नियोजनासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असुन, मोकाट गुरे, डासांचा प्रादुर्भाव, तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी मंगळवारी बाजाराचे सुयोग्य नियोजन करणे या बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्याकडे केली. यावेळी दिव्या साळगावकर, सुचिता पालव, स्वाती राणे, शुभांगी उबाळे, सिद्धी शेट्ये, राजश्री महाजन अनुजा गावडे, दर्शना मेस्त्री आदी उपस्थित होत्या.