पाडगांव गावठणवाडी युवा क्रीडा मंडळ आयोजित भव्य कब्बडी स्पर्धा संपन्न

पाडगांव गावठणवाडी युवा क्रीडा मंडळ आयोजित भव्य कब्बडी स्पर्धा संपन्न

*कोंकण Express*

*पाडगांव गावठणवाडी युवा क्रीडा मंडळ आयोजित भव्य कब्बडी स्पर्धा संपन्न*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती*

*देवगड ः प्रतिनिधी*

पाडगांव गावठणवाडी युवा क्रीडा मंडळ आयोजित भव्य एक दिवसीय कब्बडी स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा बँक संचालक अविनाश माणगावकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते नाणेफेक करून कब्बड्डी चा पहिला सामना सुरु करण्यात आला. यावेळी नाईक यांनी यावेळी स्पर्धेत सहभागी संघाना शुभेच्छा देत मंडळाच्या आयोजनाचे देखील कौतुक केले. आता हे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे अश्या विविध स्पर्धा ह्या गावा गावात होणे गरजेचे आहे. या स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण होतील. पाडगांव सारख्या गावात चांगल्या प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे पाडगांव जि.परिषद शाळेसमोरील साकवासाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. व पुन्हा तिसऱ्यांदा खासदार विनायक राऊत निवडून आल्यावर पहिला विकास कामांचा निधीतून हा पाडगांव ला देण्यात येईल असे आश्वासन नाईक यांनी बोलताना दिले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत माजी जिल्हा बँक संचालक अविनाश माणगावकर, युवासेना तालुका प्रमुख फरीद काझी, अध्यक्ष सिद्धेश माणगावकर, जेष्ठ नागरिक दिग्विजय गुरव, उपसरपंच संदीप मंचेकर, समर्थ बाबा महाराज पाडगांव व मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!