*कोंकण Express*
*उपक्रमशील शिक्षक व पालकांमुळेच शाळा आदर्श बनते:सरपंच निशा नकाशे*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
ज्या शाळेचे पालक आणि शिक्षक दोन्ही उपक्रमशील व आदर्श असतात, ती शाळाही आदर्श होते. केंद्रात आदर्श शाळा म्हणून नावलौकिकास आलेल्या तांबळवाडी येथील शाळेला जिल्हयात ही आदर्श शाळा करण्यासाठी मेहनत करण्याचे आवाहन सरपंच निशा नकाशे यांनी कासार्डे-तांबळवाडी येथे केले.
जि. प. प्राथ. शाळा कासार्डे- तांबळवाडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सरपंच निशा नकाशे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर माजी जि.प सदस्य संजय देसाई,
जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे, उद्योगपती नामदेव बांदिवडेकर,शांतीनाथ लडगे, प्राणिल शेटये,माजी सरपंच संतोष पारकर, उपसरपंच गणेश पाताडे ,ग्रा. प सदस्य अभिजित धुमाळ, श्रध्दा शेलार,जयवंती जमदाडे, पोलीस पाटील महेंद्र देवरूखकर,सोसायटी चेअरमन दिपक सावंत, मुख्याध्यापक जगदीश गोसावी,नारायण घाडी, जितेंद्र बंड,किरण ठाकूर,शा.व्य समिती अध्यक्ष गुरुनाथ पाताडे,उपाध्यक्ष शीतल साईम उपस्थित होते
मुख्याध्यापक नीलेश ठाकूर सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाळेच्यावतीने माजी जि.प. सदस्य संजय देसाई,जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे, सरपंच निशा नकाशे व इतर उपस्थित मान्यवरांचे रोप व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच निशा नकाशे यांनी शाळेच्या विशेष प्रगतीचे कौतुक करीत शाळेच्या विकासासाठी नेहमीच आमचं सहकार्य असेल असे मत व्यक्त केले
कासार्डे-तांबळवाडी व तर्फेवाडी ग्रामस्थ व शाळेच्यावतीने व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा व जेष्ठ नागरिक बाळकृष्ण जाधव, मधुकर पाळेकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच इ.१० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी विघ्नेश आईर, तन्वी पाताडे,अमित तर्फे,सपना पाताडे यांना गौरव प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले .शाळेचे मुख्याध्यापक निलेश ठाकूर, सहा शिक्षिका निकिता ठाकूर,अध्यक्ष गुरुनाथ पाताडे, उपाध्यक्ष शीतल साईम आदींचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्रीडा स्पर्धा, ज्ञानी मी होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला.
मान्यवरांच्या मनोगतात माजी जि.प सदस्य संजय देसाई,जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या प्रगतीमध्ये ग्रामस्थांच्या सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक निलेश ठाकूर,सूत्रसंचालन प्रा विनायक पाताडे तर आभार ग्रामसेवक निलेश पाताडे यांनी मानले
रात्री उशिरापर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
हा सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी तसेच कासार्डे तांबळवाडी व तर्फेवाडीतील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले

