*कोंकण Express “
*सायकल सफरीतून निसर्गाची ओळख : विद्यामंदीरच्या एन. सी. सी. विभागाचा उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
विद्यामंदिर माध्य. प्रशालेचा एन .सी .सी विभाग अनेक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतो . या विभागाचे प्रमुख श्री अमोल शेळके सर व सौ केळुसकर मॅडम विद्यार्थ्यांना नवनविन ज्ञान देण्यासाठी नेटके नियोजन सतत करत असतात . प्रशालेतून शिकून गेलेले माजीविद्यार्थी आज अनेक पदावर कार्यरत आहेत त्यांना शाळेत बोलवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख अमोल सर नेहमी करत असतात त्यातून अनेक विद्यार्थ्यांना आदर्श तत्वांची जाणीव निर्माण होत असते . शिस्त ‘ संयम , धाडस आणि राष्ट्रप्रेम या गुणांनी विद्यामंदिरचा एनसीसी विभाग सर्वगुण संपन्न आहे . या गुणाबरोबरच विद्यार्थ्यांना निसर्गाची ओळख निर्माण होण्यासाठी एनसीसी विभाग प्रमुख यांनी सायकल प्रवास सांघित पद्धतीने करून तरंदळे माईण ‘ बेळणे परिसरातील पाण्याचा साठा असलेले धरण ‘ तेथिल निसर्ग ‘ वनस्पती ‘ वेली पशू पक्षी यांची इंत्थभूत माहिती दिली गेली . प्रारंभ करतानाचा मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता . वाढत्या घाई गडबडीच्या काळात निसर्ग सानिध्य विद्यार्थ्यांना घडवून अमोल सरांनी फार मोठे कार्य वेळात वेळ काढून विद्यार्थी वर्गासाठी केले असेच कार्य आपल्या हातून घडत राहो असे गौरवपर उद्गार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. जी. कांबळे यांनी काढले असून भावी कार्यासाठी प्रशाले कडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.