जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटेचे सुयश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटेचे सुयश

*कोंकण Express*

*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटेचे सुयश*

*कनेडी हायस्कूलची यशस्वी घोडदौड कायम*

*सकल मराठा समाज कणकवली मार्फत शिवजयंती निमित्त कणकवली येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी मैत्रेयी मकरंद आपटे (इ. ९वी अ) हिने इ. ९वी ते १२वी या गटात उत्कृष्ट वक्तृत्वाचे सादरीकरण करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेती व उद्योग यासंबंधी विचार’ या विषयावर तिने अतिशय ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर करून उपस्थित रसिकांची व परीक्षकांची मने जिंकून घेतली. सदर यशाबद्दल तिला रोख रू. १०००/- , सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा कणकवली येथील शिवाजी चौक येथे संपन्न झाली. यापूर्वी एकपात्री अभिनय, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी अशा अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा मैत्रेयीने पारितोषिके पटकावली आहेत.*

*सदर यशाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मैत्रेयीचे अभिनंदन केले.*

*मैत्रेयीला प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी विषय शिक्षक तसेच तिचे वडील श्री. मकरंद आपटे, प्रशालेतील मराठी विषयाच्या तज्ज्ञ शिक्षिका श्रीम. पल्लवी हाटले तसेच प्रशालेतील इतिहास विषयाचे शिक्षक श्री. डी. व्ही. सावंत व श्री. प्रसाद मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!