*कोंकण Express*
*छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो इतिहास केला आहे, त्याचा आदर्श घेवून आम्ही काम करीत आहोत ; आ. नितेश राणे*
*छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आमदार नितेश राणे यांनी हार घालून केले अभिवादन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो इतिहास केला आहे, त्याचा आदर्श घेवून आम्ही काम करीत आहोत. शिवजयंतीच्या निमित्ताने हा इतिहास नव्या पिढी समोर येत आहे. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळे समाजामध्ये फिरताना अभिमानाने फिरतो आणि जो मानसन्मान आपल्याला मिळतोय. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. महायुती सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे, आमचे सरकारे आपल्या समाजाला टिकणारे आरक्षण देणार असल्याचे प्रतिपादन भाजपा आ. नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी सकल मराठा समाजाचे डॉ. चंद्रकांत राणे, प्रा. जी. ए. सावंत, ऍड. उमेश सावंत, भाई परब, आ. राणे यांची पत्नी नंदिता राणे, सोनू सावंत, सुशील सावंत, अभय राणे, बैंक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, महेश सावंत, बबलू सावंत, महेंद्र सांबरेकर, डॉ. विद्याधर तायशेट्ये, शिक्षक अनंत राणे, सुशांत मर्गज, श्याम सावंत, श्यामसुंदर दळवी, सूर्यकांत वारंग, शैली सावंत, स्वाती राणे, सायली सावंत, विभा सावंत, आदिती मालपेकर, पत्रकार सुधीर राणे, संतोष राऊळ, भगवान लोके, लक्ष्मीकांत भावे, दर्शन सावंत, तुषार हजारे, बच्चू प्रभूगावकर, शेखर राणे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सकल मराठा
समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे, पत्नी नंदिता राणे यांचा सत्कार करण्यात आला.