*कोंकण Express*
*पटवर्धन चौकात छत्रपतींच्या पुतळ्याला जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले अभिवादन*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर व शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या वतीने छत्रपतींना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी शिवछत्रपतींचे पूजन करून त्यांना अभिवादन केल्यानंतर सायंकाळच्या सत्रात येथे विविध कार्यक्रम व हळदीकुंकू समारंभाचे देखील आयोजन केले आहे.