*कोंकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य सप्ताह म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर – ऍड. उमेश सावंत*
*स्वराज्य सप्ताह सांगता सोहळ्यात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य सप्ताह निमित्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्सव शिवजन्माचा … स्वराज्य कार्याचा या टॅगलाईन खाली आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागरच म्हणावे लागेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश विधिज्ञ उमेश सावंत यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित स्वराज्य सप्ताह सांगता सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण ऍड. उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथील एच. पी. सी. एल. सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ऍड. उमेश सावंत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळ कर, प्रदेश सचिव सुरेश गवस, प्रदेश सचिव एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, व्ही. जे. एन. टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, प्राध्यापक हरिभाऊ भिसे, प्रसाद राणे, सौ हूमेरा नाईक, रिजा नाईक राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, प्रांतिक सदस्य, विलास गावकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडूलकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, जिल्हा प्रतिनिधी सचिन अडुळकर, दिपेश सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे दोडामार्ग तालुका अध्यक्ष सत्यवान गवस, कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, सत्यजित धारणकर, रोहन परब, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब, रिया भांबूरे, कणकवली महिला तालुका अध्यक्ष स्नेहल पाताडे, जिल्हा सचिव सतीश पाताडे, सुधाकर कार्ले, सुधाकर ढेकणे, राजेंद्र पिसे भाई डांबे, बाबू परब, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, वेंगुर्ला शहर अध्यक्ष सूरज परब, बाळू मेस्त्री, आदी उपस्थित होते.