आरे येथे ४० दात्यांनी केले रक्तदान !

आरे येथे ४० दात्यांनी केले रक्तदान !

*कोंकण Express*

*आरे येथे ४० दात्यांनी केले रक्तदान !*

*शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने उपक्रम; रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील आरे येथील शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असा संदेश देत ग्रामपंचायत कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.या शिबिरात अनेक तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी ४० दात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान केल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात.ही बाब लक्षात घेऊन सामाजिक जाणिवेतून आरे येथे शिवप्रतिष्ठानच्यावतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन निरोम गावचे सरपंच राजेंद्र राऊत यांच्या हस्ते
करण्यात आले.यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश फाळके, जेष्ठ कार्यकर्ते भाऊ कदम,माजी उपसरपंच संदिप कदम, माजी सरपंच महेश पाटोळे, आरे गावचे उपसरपंच रत्नदीप कांबळे, सौरभ कांबळे,उमेश कदम, नितिन कोकम, मेघश्याम पाटोळे, प्रशांत फाळके, सागर फाळके, पांडूरंग कदम, विनेश कदम, शामसुंदर कदम, प्रभाकर कदम, संकेत कदम, संदिप कदम, राजेंद्र कदम, किशोर मुणगेकर,रुपेश मेस्त्री, सत्यवान पाटोळे, कुलदिप सावंत, संतोष कदम, संजय कदम,प्रसन्न कदम, कन्हैया कदम, रामकृष्ण कदम, सुमित कदम, हेमांग कदम, मकरंद पाटोळे, मंगेश मुणगेकर,बंटी जेठे, नितिन जेठे, सुर्यकांत फाटक आदी मान्यवरांसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
पडवे येथील एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज व लाईफटाईम रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हे शिबीर यशस्वी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!