संवाद परिवार तळेरे तर्फे एक वैचारिक मेजवानी

संवाद परिवार तळेरे तर्फे एक वैचारिक मेजवानी

*कोंकण Express*

*संवाद परिवार तळेरे तर्फे एक वैचारिक मेजवानी…*

*”महाराष्ट्र काल, आज आणि उद्या : डॉ. सदानंद मोरे”*

*कासार्डे प्रतिनाधी : संजय भोसले*

रविवार, दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, प्रहार भवन, कणकवली येथे डॉ सदानंद मोरे यांचे “महाराष्ट्र काल, आज आणि उद्या” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. सदानंद मोरे यांच्याविषयी अगदी थोडक्यात :महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, संत तुकाराम महाराज यांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक, लोकमान्य ते महात्मा, कर्मयगी लोकमान्य, महाराष्ट्राची लोकधारा, तुकाराम दर्शन अशा अनेक ग्रंथांचे लेखक, ‘महाराष्ट्र मंथन’ या चॅनलचे संपादक, विवेकवादी विचारसरणीचे प्रतिनिधी, ना उजवे ना डावे, सम्यक संतुलित, संयमी मांडणी करणारे व्यक्तित्व आणि महाराष्ट्रातील निःपक्षपाती विचारवंत.या वैचारिक मेजवानीत आपणही बहुसंख्येने सहभागी व्हावे, यासाठी आपणा सर्वांना संवाद परिवाराकडून आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!