*कोंकण EXPRESS*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांना गोकुळ ने, कोल्हापूर जिल्ह्यातील दुध दर द्यावा, सिंधुदुर्ग जि. दूध उत्पा. संस्था प्रतिनिधीची मागणी ..*
*जिल्हा बँक आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पा. सह संघाला निवेदन सादर*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गातील दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी, जिल्ह्यात मिळणाऱ्या दूध दराच्या तफावतीबद्दल, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, कोल्हापूर- गोकुळ ला निवेदन दिले असून, कोल्हापूर जिल्ह्यात मिळणारा गोकुळचा दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा अशी आग्रही मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणारा कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा दर गाईच्या दुधाला ४:५० पैसे कमी आहे, तर म्हशीच्या दुधाला रुपये ३ ने कमी आहे. मुळात उन्हाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडे दूध उत्पादन कमी झाल्याने, हा दर आणि खर्च पाहता परवडणारा नाही. एकीकडे दूध उत्पादन वाढीसाठी सिंधुदुर्ग बैंक आणि शासन स्तरावर प्रोत्साहन योजना राबवत असताना, दरातील फरकामुळे शेतकरी आणि संस्था निरुत्साही बनत चालले आहेत. लगतच्या जिल्ह्यातील फरकामुळे शेतकरी चिंतीत आहेत. तरी संस्था प्रतिनिधींनी शेतक-यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रमाणे दूध दर मिळावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे गोकुळ संस्थेचे अधिकारी लाड, सिंधुभूमीचे संतोष हडकर यांचे कडे केले आहे.
यावेळी फोंडाघाट पंचक्रोशी दूध संस्थेचे पिंटू पटेल, गणेश परब (घोणसरी) संतोष साटम (डांबरे), तेजस बोभाटे (तोंडवली), विलास पाटील
(करूळ), सुहास तावडे इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. निवेदनावर सुमारे २५ प्रतिनिधींच्या सह्या आहेत. याची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे
अध्यक्ष मनीष दळवी यांनाही देण्यात आली आहे. यावर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी पिंटू पटेल यांनी केली
आहे…..