*कोंकण Express*
*संजय कदम यांची संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र च्या राज्याध्यक्ष पदी सर्वानुमते फेरनिवड*
*संघटनेच्या माध्यमातून समाजबांधवाना न्याय मिळवून देणार – संजय कदम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्रच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कदम यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर संजय कदम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, जरी मी पदावर असलो तरीही माझा प्रत्येक समाजबांधव या पदावर असल्याचे मानून मी संघटनेचे काम करणार. मागील पाच वर्षात संघटनेच्या माध्यमातून जसा समाजबांधवांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि न्यायासाठी झगडून न्याय मिळवून दिला त्याचप्रमाणे आगामी कार्यकाळात समाजहितासाठी काम करणार आहे.
संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या
संस्थेची पंचवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतपेढी ओरोस च्या सभागृहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेचे राज्यस्तरीय संचालक, संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते.अध्यक्ष श्री. संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने मागील पाच वर्षात राबवलेले समाजिक उपक्रम, ज्ञातीबांधवाना न्याय देण्यासाठी घेतलेले निर्णय, मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार याबाबात आवाज उठवत राज्य प्रशासनास दिलेली निवेदने,संस्थेच्या माध्यमातून काढण्यात आलेला मोर्चा, उपोषण याचा आढावा तसेच संस्थेच्या मागील पाच वर्षाचे ऑडिट राज्यसचिव श्री.प्रसाद मसुरकर यांनी सभागृहासमोर वाचून दाखविले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय कदम यांनी संस्थेचे सर्व संचालक तसेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन राज्याध्यक्ष पदाची यशस्वी धुरा गेली पाच वर्ष सांभाळली . संजय कदम यांची समाजबद्दलची असलेली निष्ठा,संस्था वाढविण्यासाठी असलेली तळमळ आणि समाजातील सर्व संघटना यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेच्या सर्व संचालकांनी तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व सभासद यांनी पुढील पाच वर्षासाठी एकमताने श्री.संजय कदम यांची महाराष्ट राज्य अध्यक्षपदी पदी फेर निवड करण्यात आली.