*कोंकण Express*
*माघी गणेश जयंती उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती*
*नाडण,असलदे,कसवण, कलमठ-लांजेवाडी, बिडयेवाडी येथील माघी गणेश जयंतीला दिली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने ठीक ठिकाणी विविध सांस्कृतिक – धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नाडण,असलदे,कसवण, कलमठ-लांजेवाडी, बिडयेवाडी येथील माघी गणेश जयंतीला भेट देत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळांकडून सुशांत नाईक यांचे शाल श्रीफल व पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.