वाढदिवस समाजसेवे चा वसा घेतलेल्या थोर व्यक्तीमत्वाचा

वाढदिवस समाजसेवे चा वसा घेतलेल्या थोर व्यक्तीमत्वाचा

*कोंकण Express*

*वाढदिवस समाजसेवे चा वसा घेतलेल्या थोर व्यक्तीमत्वाचा*

*शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश जी पारकर यांची प्रतिक्रिया

*कणकवली ः प्रतिनिधी*

वरवडे गावचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते विजय कोदे यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून “माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळांचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, सर्व मंडळांचे सल्लागार संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या संकल्पनेतून वरवडे गावी सामाजिक कार्यकर्ते विजय कोदे यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला,

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई बोंद्रे यांनी केले,

*यावेळी युवा नेतृत्व सोनु सावंत, डॉक्टर राणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली, सन्मान मूर्तींना शुभेच्छा दिल्या,

*यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी असे म्हटले की, विजय कोदे म्हणजे या कणकवली तालुक्यातील च नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक झंझावात असुन, माणूस हा किती वर्षे जगला हे महत्त्वाचे नसुन तो कसा जगला या फार मोठे महत्त्व असून, अनेक वेळा त्यांना समाजवादी म्हणून लढताना पाहिल, आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना पाहिल, आणि सर्वांनाचा हवेहवेसे वाटणारे, बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे विजय कोदे, अशा या व्यतिमत्वाला दीर्घायुष्य लाभो,

*यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की,विजय कोदे, संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या सोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साथीने गेली ४० ते ४५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना कधीही पक्ष कोणता याचा विचार केला नाही, समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील यालाच महत्त्व दिले, आणि आज या वरवडे गावी एकाच मंचावर सर्वांना एकत्रित पाहून, अशीच एकीची भावना आपण जपली तर, सिंधुदुर्ग च नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही,

*यावेळी विजय कोदे यांना माऊली मित्र मंडळ, बाजार पेठ मित्र मंडळ यांच्या वतीने संदेश पारकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

*यावेळी व्यासपीठावर कणकवली, वरवडे गावातील मान्यवर उपस्थित होते, संपूर्ण पंचक्रोशीतील विजय कोदे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला,

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मालंडकर यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!