वेंगुर्ले तालुक्यातील रेडी यशवंतगड किल्ल्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ९ .१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी यशवंतगड किल्ल्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ९ .१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

*कोंकण Express*

*वेंगुर्ले तालुक्यातील रेडी यशवंतगड किल्ल्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ९ .१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर*

*पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी निधी केला मंजूर*

*भाजपा च्या पाठपुराव्याला यश — प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग* .

महाराष्ट्र शासनाच्या सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मान. वित्तमंत्र्यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या जतन संवर्धनासाठी ३०० कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती . त्यानुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतच्या १०३ कोटीच्या पुरवणी मागणीस मान्यता देण्यात आली . या अनुषंगाने या शिवकालीन किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन यशवंतगड किल्ला , सुकळभाट – रेडी , ता.वेंगुर्ला , जि.सिंधुदुर्ग या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची विनंती संचालक , पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालनालय यांनी मागणी केली असता सदर प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून , सदर कामास ९१६३१३४९ रु.चा निधी मंजूर झाला आहे .
यशवंतगड किल्ल्यास निधी मंजूर व्हावा म्हणून भाजपा ता.उपाध्यक्ष व माजी सभापती प्रितेश राऊळ , रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी सातत्याने भाजपा च्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नाम. नारायणराव राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे केली व त्यांच्याच शिफारशीनुसार सदर काम मंजूर झाले असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
महाराष्ट्राचा अभिमान , महाराष्ट्राची अस्मिता आणि लोकाभिमुख राज्यकारभाराचा जागतिक आदर्श ठरलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांचे गड किल्ले पुनर्जीवित करण्याचा महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!