कसवण येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन ; ७ व्या वर्धापन दिनानिमित्त

कसवण येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन ; ७ व्या वर्धापन दिनानिमित्त

*कोंकण Express*

*कसवण येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन ; ७ व्या वर्धापन दिनानिमित्त*

*१२ फेब्रुवारी ते ‌१३ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील कसवण गांवकरवाडी येथील श्री गणेश मंदिरात श्री.गणेश कृपा कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कसवण गांवकरवाडी यांच्या वतीने ७ व्या वर्धापन दिनानिमित्त
श्री माघी गणेश जयंती उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार १२ फेब्रुवारी रोजी श्री गणेश मंदिर सातवा वर्धापन दिनानिमित्त सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तींची सहवाद्य मिरवणूक ,सकाळी १० वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक व धार्मिक विधी ,सकाळी ११ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती ,दुपारी १ ते ३ वा.महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ६ वाजता होम मिनिस्टर श्री गणेश मानाची पैठणी ,सायंकाळी ६ ते ८ वाजता सुस्राव्य भजनांचा भरगच्च कार्यक्रम, रात्री ८ वाजता महाआरती रात्री ८:३० वाजता स्थानिक सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम, रात्री ९:३० वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापन यांचा दशावतारी नाट्य प्रयोग मोरया गोसावी सादर केला जाणार आहे.

या निमित्ताने मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव पहाटे ५.३० वा. श्रींची काकड आरती, सकाळी ९.०० वाजता श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद दुपारी ३ ते ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते ५:३० वाजता स्थानिक भजनांचा भरगच्च कार्यक्रम सायंकाळी ५:३० ते ८ वाजता,लकी ड्रॉ कुपन योजना सोडत निकाल ,रात्री ८ वाजता महाआरती रात्री, ८:३० वाजता महाप्रसाद जल्लोष युवाईचा आदी कार्यक्रम होणार आहेत.

१४ फेब्रुवारी रोजी समाराधना व कार्यक्रमांची समाप्ती होणार आहे.भाविक भक्तांनी तीर्थ प्रसाद, महाप्रसाद, आणि सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.गणेश कृपा कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कसवण गांवकरवाडी यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!