विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी,शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरे केले विविध ‘डेज’

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी,शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरे केले विविध ‘डेज’

*कोंकण Express*

*विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी,शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरे केले विविध ‘डेज’*

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात विविध कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात साजरे केले जातात.त्याचप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध डेजचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लूटला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचे फूड स्टॉल लावण्यात आले होते.

यामध्ये हेलोवन डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, सारी डे, टाय डे, वेस्टर्न डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे साजरे करण्यात आले. या दरम्यान रॅम्प वॉक व विविध फनी गेम्सही घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन परंपरा, वारकरी, बॉलिवूड अभिनेता अभिनेत्री यांच्या वेशभूषा अशा विविध वेषभूषा करून रोमहर्षक ट्रॅडिशनल डे साजरा केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे,संस्था खजिनदार व महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त मंदार सावंत,श्रीम. अदिती सावंत, प्राचार्य प्रा. चंद्रशेखर बाबर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या प्रांगणामधे हे सांस्कृतिक उपक्रम प्रा. चंद्रशेखर बाबर व प्रा. अमर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. एस.भोकरे आणि श्रीम. एस. कोचरेकर नियोजनातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने व सहभागाने पार पडले.सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल प्राचार्य प्रा. चंद्रशेखर बाबर यांनी सर्वांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!