*कोकण Express*
*कणकवली नाभिक महिला कार्याध्यक्षपदी प्रिया दशरथ चव्हाण*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका नाभिक महिला आघाडी संघटनेच्यावतीने ३ फेब्रुवारी रोजी ‘हळदीकुंकू’ कार्यक्रम दुपारनंतर ३ ते ६ या वेळेत कणकवली येथील अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी महिला आघाडीची सभा लावण्यात आली होती.
त्यावेळी व्यासपीठावर कणकवली तालुकाध्यक्षा संजना संजय चव्हाण, तालुका सल्लागार दिप्ती दत्ताराम चव्हाण, जिल्हा सदस्या रचना राजन चव्हाण, ज्येष्ठ सदस्या नंदा नंदकुमार चव्हाण, सचिव ईश्वरी प्रवीण कुबल, सहसचिव हेमांगी अनिल अणावकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
संघटनेच्यावतीने सर्व पदाधिकारी महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अतिपरिणामकारक व्यक्तींच्या सात सवयींविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. नाभिक महिलांनी आपला सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले. तालुकाध्यक्षा यांना सहाय्य करण्यासाठी नवीन पदाची निर्मिती करण्यात आली.
कणकवली नाभिक महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी प्रिया दशरथ चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महिला संवर्धन निधी गोळा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
तसेच हळदीकुंकू समारंभाचे औचित्य साधून ‘महिलांसाठी योगाचे महत्त्व’ या विषयावर योगवल्लरीच्या योगशिक्षिका ज्योती पंडित यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला कणकवली तालुका नाभिक महिलांनी उपस्थित राहून संघटनेचा उपक्रम उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ कणकवली तालुका संघटनेचे सचिव प्रवीण कुबल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सभेला २० पेक्षा जास्त नाभिक महिला भगिनी उपस्थित असल्याबद्दल सहसचिव हेमांगी अणावकर यांनी आभार व्यक्त केले.