राम नामाच्या जयघोषात रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्त अयोध्येला रवाना

राम नामाच्या जयघोषात रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्त अयोध्येला रवाना

*कोकण Express*

*राम नामाच्या जयघोषात रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्त अयोध्येला रवाना*

*टप्प्यात मतदार संघातून २८३ भक्तांचे प्रस्थान, पनवेल येथून रेल्वेने होणार प्रवास*

*आमदार नितेश राणे यांनी राम भक्तांची भेट घेत प्रवासाला दिल्या शुभेच्छा..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

प्रभू रामचंद्र की जय… जय… श्री राम… जय श्री राम.. अशा राम घोषात आज नांदगावची सकाळ झाली. औचित्य होते ते

कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील राम भक्तांना अयोध्या दर्शन, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी नांदगाव तिठा येथे देवगड, कणकवली, वैभववाडी या मतदार संघातून पहिल्या टप्यात २८३ रामभक्त घेवून रवांना झाले. आराम बस पनवेल पर्यंत जाणार असून पुढील प्रवास माजी आमदार प्रमोद जठार यांच्या सोबत रेल्वेने होणार आहे. भारतीय जनता पार्टी च्या वतीने याचे नियोजन केले आहे. आमदार नितेश राणे राम भक्तांची नांदगाव येथे भेट घेवून प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

आमदार नितेश राणेंनी श्रीफळ वाढवून प्रवासाला सुरुवात केली आहे. व सर्वांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. यावेळी जय श्री राम च्या घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून श्री राम भक्तांसाठी मोफत अयोध्या दर्शन व्यवस्था भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघातून आज सकाळी ९ वा. नांदगाव तिठा येथे एकत्र येत अयोध्या जाण्यासाठी राम भक्त रवाना झाले आहेत.

यावेळी मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, महीला तालुका अध्यक्षा सौ. हर्षदा वाळके, माजी सभापती दिलीप तळेकर, हनुमंत बाळके, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, रज्जाक बटवाले, अब्बास बटवाले, कमलेश पाटील आदी उपस्थित होते.

फटाक्यांची आतषबाजी करत जय श्री राम, प्रभु रामचंद्र की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!