*कोंकण Express*
*युवासेनेचा निर्धार विनायक राऊतच पुन्हा खासदार*
*नेरूर जिल्हा परिषद विभागातील युवासेनेच्या बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
युवासेना कुडाळ तालुका आयोजित निर्धार विक्रमी विजयाचा सुसंवाद निष्ठावंतांचा या उपक्रमाला नेरूर जिल्हा परिषद विभागात युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोकण सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या कामांचे माहितीपत्रक युवकांना देण्यात आले यावेळी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला आमदार वैभव नाईक यांनीही भेट दिली यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी सरपंच नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, नेरूर सरपंच सौं घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी, युवासेना उपतालुकाप्रमुख विनय गावडे, युवासेना विभागप्रमुख मितेश वालावलकर, युवासेना उपविभाप्रमुख रुपेश खडपकर, वैभव सरमळकर आदी युवासेना पदाधिकारी, युवासैनिक उपस्थित होते.