*कोंकण Express*
*परशुराम उपरकर यांची पक्षातून हकलपट्टी…*
*पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिल्याची उपरकर यांची माहिती.*
*सिंधुदुर्ग,ता.०८:-*
मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकलपट्टी केल्याचे मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी पत्रक द्वारे जाहीर केले आहे शिरीष सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेला पत्रकात म्हटले आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचे यापुढे मनसेची कुठलाही संबंध असणार नाही या पत्रकातून अप्रत्यक्षपणे उपरकर यांची अकलपट्टीच केल्याचं जाहीर करण्यात आले आहे.तर दुसरीकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहीत मनसेच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्त्वाचाही राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.आता माजी आमदार परशुराम उपरकर कोणत्या पक्षात जातील याकडे लक्ष लागून राहिले आहे.