*कोकण Express*
*जिल्हा नियोजन समिती पदी नऊ निमंत्रित सदस्यांची निवड….*
*विकास सावंत यांच्यासह; जान्हवी सावंत, सतीश सावंतांचा समावेश…*
*ओरोस,ता.२५:*
जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ सदस्यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती च्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाने आज नियुक्ती केली आहे.
जिल्हा नियोजन समिती मध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन जिल्ह्यातील ९ सदस्यांची नियुक्ती केली आहे. यात सतीश सावंत, जान्हवी सावंत, हरी खोबरेकर, संदेश पारकर, प्रफुल्ल सुद्रिक, बाबुराव धुरी, विकास सावंत, अतुल रावराणे, हरी कनयाळकर यांचा समावेश आहे. याबाबत आज शासन निर्णय झाला आहे. या ९ सदस्य २८ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
. जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून निश्चित पणे महिला आघाडी आणि कसाल मतदार संघाला लाभ होणारच आहे. महिलांच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी ह्या व्यासपीठाचा मी उपयोग करेन. समस्त महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिलांचा हा सन्मान आहे असे मत जान्हवी सावंत यांनी बोलताना सांगितले.