*कोकण Express*
*शकुनी मामा राऊतने शिवसेना,राष्ट्रवादी फोडून काँग्रेस फोडण्याचे टार्गेट घेतले आहे*
*प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका*
*”अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेंगा..” म्हणणाऱ्यांवर आता ओसाड गावचे पाटील होण्याची वेळ*
*खा.सुप्रिया सुळे यांना आ.नितेश राणे यांनी सुनावले
*मंत्री केसरकर यांचे आरोप खरेच*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अपेक्षे प्रमाणे ज्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि घामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवली त्या अजित दादा ना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले.राष्ट्रवादी काँग्रेस च्या लोकांना हा निर्णय सुखावणारा होता तसा तो संजय राऊत ला आनंद देणारा आहे. दिल्ली मधील घरी तो मफलर घालून नाचला असेल.
दुसऱ्यांची घर फोडणे, आग लावण्याचे एकमेव काम संजय राऊत करतो. राजसाहेब आणि उद्धव यांच्यात वाद लावले,ते घर फोडले,पक्ष फोडला,आता शरद पवार यांच्या घरात आग लावून पक्ष फोडला. भांडुप चा हा शकुनी मामा सर्वांच्या घरात वाद लावत आहे. आता काँग्रेस पक्ष त्याचे टार्गेट आहे.कोल्हापूर चे छत्रपतींच्या घरात काड्या लावत आहे.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
आमदार नितेश राणे यांनी प्रहार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी संजय राऊत चा समाचार घेतला.जो बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही तो कोणाचाच होणार नाही.आता त्याचा काँग्रेस वर डोळा आहे. आता संजय राऊत कोल्हापूर च्या छत्रपती घराण्यात वाद लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.असे सांगताना आमदार नितेश राणे म्हणले,राज्यसभेची ६ जागा छत्रपती संभाजी राजे यांना द्यावी अशी चर्चा चालू असताना त्याच्या वडिलांचे नाव चालविण्याचे काम हा संजय राऊत करत आहे.आधी ठाकरे आणि आता पवार यांच्या घरात यशस्वीपणे वाद लावलेत. अशा या माणसाला कोणी घरात घेऊ नये त्याची ती लायकी नाही अशी टीका केली.ज्यांनी स्वतःच्या हातानी मालकाचा पक्ष संपवला तो दुसऱ्याचं भल कस करणार असा सवालही केला.
“अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेंगा..” अस म्हणणाऱ्या सुप्रिया ताईला अकेला फडणवीस काफी है हे समजलं असेल.ओसाड गावचे पाटील होण्याची वेळ त्यानेच तुमच्यावर आणली आहे हे आता कळले असेल असा टोला हाणला.
महाराष्ट्राच्या जनतेच्या विरुद्ध जाऊन गद्दारांचा खजिना महाविकास आघाडीने निर्माण केला होता.मुघलांचे वंशज व औरंग्याच्या पिल्लांनी आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. असे सांगतानाच हिंदुत्वाच्या विचाराचे सर्व पक्ष एकत्र येत असतील तर मनसेनेने स्वागत आहे. निर्णय पक्षश्रेष्ठीं घेतील. राज साहेब ठाकरे यांचा डीएनए हिंदुत्वाचा आहे त्यामुळे त्यांचे स्वागतच होईल.
मंत्री केसरकर जे बोलले त्याला माझं समर्थन आहे. उद्धव ठाकरे पदासाठी व आमदारकी साठी पैसे घेतात हा आरोप केद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी रंगशारदा येथील बैठकीत केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे बिकावू आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
कोकणातील जनता उद्धव ठाकरेंना आपला कुटुंब प्रमुख मानात नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत ते दिसेल. असे आमदार नितेश राणे सांगितले.