वेंगुर्ले भाजपा महीला मोर्चाच्या वतीने नुतन पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

वेंगुर्ले भाजपा महीला मोर्चाच्या वतीने नुतन पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

*कोकण Express*

*वेंगुर्ले भाजपा महीला मोर्चाच्या वतीने नुतन पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत*

सर्व जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले पोलिस हे न्यायाचे रक्षक आणि अन्यायाचे भक्षक असतात. सभोवताली पोलिस दिसला की सर्वाना सुरक्षित वाटू लागते. एक पोलिस अधिकाऱ्याचे जीवन अनेक संकटे आणि शौर्याने भरलेले असते. परंतु संकटे आणि जोखमीला न घाबरता ते प्रत्येक परिस्थितीला भीडण्यासाठी तयार असतात. पोलिस निरीक्षक श्री. संदीप भोसले यांची वेंगुर्ला पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्या बद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे म्हणुन आज वेंगुर्ला पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक तथा कर्तव्यदक्ष अधिकारी श्री संदीप भोसले साहेब यांना पुष्पगुच्छ म्हणून देत शुभेच्छा दिल्या. भाजपा वेंगुर्ला महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा खानोलकर , महीला मोर्चा जि. उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, प्रार्थना हळदणकर , श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर , हसीना बेन मकानदार , आकांक्षा परब उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!