*कोंकण Express*
*शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित कोकण दौरा*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ४ व ५ फेब्रुवारीचा कोकण दौरा जाहीर झाला आहे*
रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मोपा विमानतळावर आगमन व मोपा विमानतळ येथून सावंतवाडी कडे प्रयाण. दुपारी १२.४५ वा. सावंतवाडी, गांधी चौक येथे शिवसैनिकांशी संवाद (सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ). दुपारी १.३० वा. सावंतवाडी, गांधी चौक येथून कुडाळ कडे प्रयाण. २ वाजता कुडाळ, जिजामाता चौक येथे शिवसैनिकांशी संवाद (कुडाळ विधानसभा मतदारसंघ), २.३० वा. कुडाळ येथून मालवण कडे प्रयाण. ३.२० वा. शासकीय विश्रामगृह, मालवण येथे आगमन, ४ वा. शासकीय विश्रामगृह, मालवण येथून मालवण बंदर जेटी कडे प्रयाण. ४.३० वा. मालवण बंदर जेटी येथे आगमन व किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रयाण, सायंकाळी ५.३० वा. मालवण बंदर जेटी येथून आंगणेवाडी कडे प्रयाण, ६ वा. आंगणेवाडी येथे आगमन, ६.१५ वा. आंगणेवाडी येथून कणकवली कडे प्रयाण. ७ वा. कणकवली, आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे शिवसैनिकांशी संवाद (कणकवली विधानसभा मतदारसंघ, ७.३० वा. आ. वैभव नाईक यांचे निवासस्थान, कणकवली कडे प्रयाण,
सोमवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. कणकवली येथून राजापूर कडे प्रयाण, ११ वा. राजापूर जवाहर चौक येथे शिवसैनिकांशी संवाद (राजापूर विधानसभा मतदारसंघ), ११.३० वा. राजापूर जवाहर चौक ते धूत पापेश्वर मंदिर कडे प्रयाण. ११.४५ वा. धूत पापेश्वर मंदिर दर्शन व मंदिर बांधकाम पाहणी, १२.१५ वा. धूत पापेश्वर मंदिर ते रानतळे- पावसमार्गे रत्नागिरीकडे प्रयाण, दुपारी १.४५ वा. शिवसेना कार्यालय आठवडा बाजार येथे शिवसैनिकांशी संवाद (रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ), दुपारी २.१५ वा. आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी आगमन, ३ वा. आ. राजन साळवी यांच्या निवासस्थान येथून विमानतळ म्स्ना मार्गे करबुडे फाटा-उक्षी-वांद्री मार्गे चिपळूण कडे प्रयाण. साय ५ वा. चिपळूण, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शिवसैनिकांशी संवाद (चिपळूण विधानसभा मतदारसंघ), ६ वा. चिपळूण येथून खेडकडे प्रयाण, ७.०५ वा. खेड रेल्वे स्टेशन येथून वंदे भारत एक्स्प्रेसने (२२२३०) मुंबईकडे प्रयाण असा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे.