*कोंकण Express*
*”देशाला घंटा वाजवणारा तरुण नको” -सावरकर चरित्र गायक सतीश भिडे यांचे प्रतिपादन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
देशाला मंदिरात घंटा वाजवीणाऱ्या तरुणांपेक्षा देशद्रोह्यांना बडवीणाऱ्या तरुणांची गरज आहे, असे भावनिक आवाहन स्वा. वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी विलेपार्ले येथे प्रजासत्ताक दिनी केले. देवगड तालुक्यातील जामसंडे येथील असलेल्या सतीश भिडे यांनी 3083 वा कार्यक्रम नुकताच सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार पराग अळवणी, श्रीकृष्ण आंबेकर, नगरसेवक सामंत, डॉ. कृष्ण पडसळगिकर, मेधा पडसळगिकर, माधवराव कर्वे, सौं. कर्वे, सागर दवंडे, जुगल उदेशी या मान्यवरांसह असंख्य रसिक उपस्थित होते. यावेळी बोलताना सतीश भिडे म्हणाले की, आपल्या देशाचा एकमेव शत्रू जातीयता असून तोच नष्ट करण्याचे आवाहन केले. यावेळी जेष्ठ गायक श्रीकांत साठे ह्यांची उपस्थिती होती. यापूर्वी भिडे यांचा हा कार्यक्रम महाराष्ट्र सह दुबई, अबुधाबी, गोवा, केरळ राज्य, कर्नाटक, गुजरात अशा विविध राज्यात झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी याचे विनामूल्य प्रयोग झालेले आहेत. या कार्यक्रमाला यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांचे आशिर्वाद लाभले आहेत. तर संगीतकार सुधीर फडके, गगनगिरी महाराज, प्रतापराव माने, नानासाहेब धर्माधिकारी, स्वामी विद्यानंद, स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वती, रामकृष्ण क्षीरसागर महाराज, विद्याधर गोखले, कसोटीवीर माधव मंत्री, व्हाईस ऍडमिराल आवटी, प्रमोद नवलकर, ब्रह्मचारी विश्वनाथजी, ज्योतिषी शरद उपाध्ये, राष्ट्रीय कीर्तनकार कै. गोविंदस्वामी आफळे ह्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सादर केले आहेत.सतीश भिडे यांच्या या कार्यक्रमाला तबला वादक तन्मय रिसबूड, जयेश ठक्कर ह्यांची बहुरूपी साथ संगत, सौं. चित्रा जोशी, सरोज डोंगरे, विद्या पराडकर ह्यांची सुरेल गायकी व सौं. सरिता सागवेकर, ज्योत्स्नाताई जाधव, ज्योती शेवडे , सचिन पाठोले, अक्षय शेवडे ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कार्यक्रम रंगत गेला.