कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२४’ सायक्लोथॉनचे आयोजन

कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२४’ सायक्लोथॉनचे आयोजन

*कोंकण Express*

*कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे ‘इन्स्पायर
सिंधुदुर्ग २०२४’ सायक्लोथॉनचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कनक रायडर्स सायकल क्लब कणकवली, सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 फेब्रुवारी रोजी, ‘स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग, सायकल राईड सर्वांसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी” ही टॅगलाईन ठेवून “इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२४” (वर्ष सहावे) या सायकल मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्याची साठी सज्ज झाला आहे, अशी माहिती सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव रुपेश तेली यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मकरंद वायंगणकर, कैलास सावंत, संजय बिडये, विष्णू रामा गडे, दीपक शिंदे, प्रसाद बुचडे, सुमित राणे, रोशन राणे
कनक रायडर सायकल क्लब कणकवली स्थापन होऊन जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या पाच वर्षामध्ये सायकलचा वापर दैनंदिन जीवनात वाढवण्यासाठी लोकांना विविध मार्गानी प्रेरित केले आहे.

देशाच्या भावी विकासात तरुण आणि मुलांचा महत्त्वाचा वाटा असतो, मुलांनी व विद्याथ्यांनी सायकल मध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी या दृष्टीने सायकलिंग विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवावे या दृष्टीने विद्यार्थ्यांना सर्वांगसुंदर बनवून निसर्ग व मानवी मूल्यांची आजन्म जपणूक करण्याचा ध्यास घेऊन कनक रायडर्स आज भब्य सायकल मॅरेथॉन घेत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रतिदिन ५ किलोमीटर पासून सुरू केलेला प्रवास प्रतिदिन २०० किलोमीटर पर्यंत नेताना कनक रायडर्स चे अनेक सदस्य दिसत आहेत.

या सायकल क्लबने ज्या ज्या वेळी शक्य असेल तेव्हा तेव्हा, सायकल हाच अजेंडा समोर ठेवून प्रत्येक सदस्याच्या शिवजयंती, प्रजासत्ताक राईड, कोजागिरी नाईट राईड, यामध्ये भाग घेण्यासाठी उस्फूर्तपणे पाठीशी उभा राहिला आहे. इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ ही सायक्लोथॉन कुडाळ सायकल क्लब यांनी घेतल्यानंतर इंन्स्पायर सिंधुदुर्ग-२०२४ चे यजमानपद, जिल्हा सायकल असोसिएशनच्या अनुमोदनाने, कणकवली कनक रायडर्स सायकल क्लब ही भव्य सायकल रेली भूषविण्यासाठी सज्ज आहे. ही स्पर्धा २५ किलोमीटर, ५० किलो मीटर व १०० किलोमीटर अशी विभागलेली अगेल. त्यामध्ये यजमान सिंधुदुर्गामह गोवा, कर्नाटक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील सायकल पडू सहभागी होणार आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकालाच मेडल्स, सर्टिफिकेट्स व टी-शर्ट दिली जाणार आहेत.

या सायक्लोथॉनमध्ये २५ किलोमीटर गटात स्पर्धकांना कणकवली ते श्री देव रवळनाथ मंदिर करंजे अंसा परतीची, ५० किलोमीटर गटाकरिता कणकवली ते करंजे मार्ग मराठे कॉलेज फोंडा असा परतीचा, तर १०० किलोमीटर गटासाठी कणकवली करंजे मराठे कॉलेज फोंडा नांदगाव शिरगाव तळेबाजार परत व आयनल फाटा चाफेड भरणी तरंदळे कणकवली असा मार्ग असेल. या मार्गावरून सायकल सफर सिंधुदुर्गातील निसर्ग नव्याने गाव असेल हे मात्र नक्की.

यामध्ये २५ किलोमीटर दोन तास, ५० किलोमीटर चार तास व १०० किलोमीटर करिता सात तास असा वेळ निश्चित केला आहे. नियोजित मार्गावर क्लब तर्फे सपोर्ट व्हेईकल, अॅम्बुलन्स, सोबत तज्ञ सायकलस्वार अशा सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरून येणारे स्पर्धक सहभागी असतीलच पण आपल्या जिल्ह्यामधील जास्तीत जास्त सायकल स्वारांनी या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होऊन आपला फिट्नेस सिद्ध करावा व पुन्हा एकदा सायकलिंग ला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन क्लब तर्फे करण्यात आले आहे. ही सायक्लोथॉन यादगार होण्याच्या दृष्टीने क्लबने जय्यत तयारी केली आहे. खरंतर ही सायक्लोथॉन म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा उत्तम आरोग्याचा संदेश देणारी रॅली म्हटले तरी वावगे उरणार नाही. या सायक्लोथॉनमध्ये क्रमांकांना फारसे महत्व नसून अंतर पूर्ण करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे ज्या सायकलिस्टना यामध्ये सहभाग घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी क्लब तर्फे मोबाईल क्रमांक ९४२२६३३७२१, ९४२२४३५५७७ आणि गूगल फॉर्म लिंक

https://forms.gle/8c45m5qmiL28b1EU

जारी करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!