*कोंकण Express*
*वाहतुकीच्या नायमांचे पालन करून रस्ता सुरक्षा यंत्रनेला मदत करा:- आशिष जाधव*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
महामार्ग असो वा इतर मार्गावर प्रवास करताना आपल्याकडून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची आपणच खबरदारी घेतली पाहीजे याचीच जनजागृती होण्यासाठी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.तरी वाहतूकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याबरोबरच हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे असून अल्पवयीन मुलांना गाडी देऊ नका असे प्रतिपादन सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस आशिष जाधव यानी केले.ते तळेरे येथे रिक्षा संघटनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वाहतूक पोलीस, सिंधुदुर्ग याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा सप्ताहात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतूक पोलीस श्री आशिष जाधव, सौ वर्षा मोहिते, सावकर वावरे याच्यासह तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, पंचायत समिती माजी सभापती दिलीप तळेकर, माजी जि.प.सदस्य सुधिर नकाशे , उपसरपंच शैलेश सुर्वे,सुर्यकांत तळेकर, रिक्षा संघटना अध्यक्ष राजू तळेकर,दादा तळेकर,विजय देसाई,राजू जठार, राजकुमार तळेकर, प्रविण वरुणकर रिक्षा संघटना,टेम्पो संघटना, मॅजिक संघटना सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .पुढे बोलताना श्री. जाधव म्हणाले, आम्ही रस्त्यावर अल्पवयीन मुलांची गाडी अडवली तर एकदा माफ करा अस आईवडील सांगतात मात्र पुढे होणाऱ्या दुर्घटनेला आईवडील जबाबदार असतात. ड्रिंक्स करून गाडी चालवणे धोकादायक आहे.सर्व्हीस रोड वरून मुख्य हायवेवर जाताना गाडया बघूनच जा. अपघातानतंर आपण घटनास्थळी असाल तर मदतकार्य करा असे सांगितले. यावेळी वाहतूकच्या नियमांचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.