*कोंकण Express*
*कास्ट्राईब शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा 4 फेब्रुवारीला कोल्हापूर येथे*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटनिस आकाश तांबे यांचे अध्यक्षितेखाली दि .22/01/2024 रोजी राज्य कार्यकारिणी ऑनलाईन बैठक झाली.सदर बैठकीमध्ये झालेल्या ठरवानुसार वार्षिक सर्वसाधारण सभे पूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यातील सभासदांची वार्षिक सभासद वर्गणी संघटनेच्या बँक खात्यात संबधीतानी त्वरीत जमा करावी. तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला राज्यातील सर्व सभासदांनी उपस्थित राहावे.जेवण व निवास व्यवस्था नियोजन करण्यासाठी आपण येणाऱ्या सभासदांची संख्या किमान 2 दिवस अगोदर गौतम वर्धन (जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर ) यांना सांगावी.कास्ट्राईब शिक्षक संघटना वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.4 फेब्रुवारी 2024 रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहात घेण्याचे या वेळी सर्वानुमते ठरले. तरी जास्तीत जास्त सभासदानी.या सभेस उपस्थिति दर्शवावी असे आवाहन आकाश तांबे सरचिटणीस,कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यानी केले आहे.