*कोंकण Express*
*”योगासनामुळे व्यक्तींची एकाग्रता वाढून जीवनाविषयी दृष्टिकोन सकारात्मक होतो”. – अजय राज वराडकर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
योगासनांमुळे माणसाला मनशांती मिळून व्यक्तीची एकाग्रता वाढते तसेच व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक होतो, त्याचबरोबर दैनंदिन कामातील आपला उत्साह वाढतो त्यामुळे सर्वांनी नियमित योगा करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी केले. ते वराडकर हायस्कूल कट्टा च्या सिद्धिविनायक सभागृहात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त करीत होते. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा ,संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा, तसेच वराडकर इंग्लिश मीडियम व सायन्स स्कूल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 27 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून 48 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री अजयराज वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्था सचिव श्री सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, वरडकर हायस्कूल कट्टा स्कूल कमिटी चेअरमन श्री सुधीर वराडकर, सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स चे सचिव डॉ. तुळशीराम रावराणे, आभाळमाया ग्रुपचे श्री राकेश डगरे, डॉ.सोमनाथ परब,वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक श्री ऋषिकेश नाईक ,कट्टा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रविंद्र गावडे व इतर शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक व पालक उपस्थित होते.
या स्पर्धेदरम्यान उपस्थिततांना मार्गदर्शन करताना डॉ. तुळशीराम रावरणे म्हणाले कि, शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि माणसाचे शरीर व आत्मा सुखी करण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे सांगून त्यांनी योगासन स्पर्धेतील स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक श्री संजय नाईक म्हणाले, योगासनांमुळे विद्यार्थी व तरुणांना अभ्यास तसेच प्रत्येक कामात स्फूर्ती मिळते त्याचबरोबर व्यक्ती भविष्यात निरोगी व आनंदी जीवन जगू शकते. सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात आली त्यात चार ते आठ वयोगटातून मुलगे प्रथम क्रमांक वेदांत उल्हास गावडे, द्वितीय क्रमांक आदित्य उल्हास पाटकर तृतीय क्रमांक पियुष अमीर गावडे तर मुलींमधून प्रथम क्रमांक मृण्मयी अंकुश वायंगवडेकर, द्वितीय क्रमांक कल्पना रावजी पावसकर तृतीय क्रमांक गार्गी घनश्याम राणे तसेच आठ ते चौदा वयोगटातून मुलगे प्रथम क्रमांक कल्पेश उदय निकम द्वितीय क्रमांक आयुष अवधूत बागवे,तृतीय क्रमांक भावेश धोंडी घाडीगावकर तर मुलींमधून प्रथम क्रमांक अस्मि सचिन राव,द्वितीय क्रमांक अनुष्का अभिजीत आपटे तृतीय क्रमांक काव्या मुक्तानंद गवंडळकर तर 14 ते 18 वयोगटातून मुलगे प्रथम क्रमांक राजाराम चंद्रहास सावंत ,मुली प्रथम क्रमांक सानिका प्रवीण मत्तलवार,द्वितीय क्रमांक त्रिशा ऋषिकेश नाईक,तृतीय क्रमांक सानवी केशव कुऱ्हाडे याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी डॉ.तुळशीराम रावराणे, श्री प्रकाश कोचरेकर,श्रीमती श्वेता पळसुले- गावडे,श्री संजय भोसले,श्रीमती नीता सावंत यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना श्रीमती वैष्णवी लाड यांनी योगासनांचे महत्त्व विषद करून विद्यार्थ्यांना दैनंदिन योगा करण्यासाठी आवाहन केले. आभाळमाया ग्रुप व स्मिता कॉम्प्युटर कट्टा यांसकडून विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. योगशिक्षिका कु. निकिता लाड यांनी तसेच कट्टा महाविद्यालयाच्या एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.