*कोंकण Express*
*अप्पासाहेब पटवर्धन चौकात पोलीस दलातील निवृत्त A S I यांचा सन्मान*
*आज दिनांक २९/०१/२०२४ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली येथे “परमहंस बाबा भालचंद्र” या नावाने आजच नामकरण झालेल्या उड्डाण पुलाच्या येथे “बाबा भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस दलातील निवृत्त ASI श्री उत्तम जगन्नाथ आंबेरकर यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला,
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते, अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील रिक्षा चालक मालक, माऊली मित्र मंडळाचे बाबुराव घाडिगावकर, प्रभाकर कदम, प्रसाद पाताडे, भगवान कासले, यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,
*यावेळी माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते,
*यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, आमचे पोलीस दलातील मित्र ( ASI ) या पदावरून ३१ जानेवारी २०१८ रोजी निवृत्त झाल्यानंतर हि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, ३६ ते ३७ वर्षे पोलीस दला मध्ये, कणकवली पोलीस ठाण्यात ज्यावेळी सेवा बजावत होते, त्याकाळच्या परिस्थितीत ही न डगमगता सर्वात कठीण काळात, आपल्या घरच्यांचा, सणावारांचा आणि ते सुद्धा अप्पासाहेब पटवर्धन चौकात, दिवसाचे चौवीस तास सेवा बजावत असताना, आमच्या कणकवली नगरीत कशी सुखशांती नांदेल याच विचाराने, आमचा पोलीस दलातील मित्र उत्तम हा सतत कार्यरत असायचा, अशा या निस्वार्थी मित्राचा आम्हाला गर्व आहे, समस्त कणकवली वासी यांच्या वतीने आम्ही आमच्या मित्राला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देतो,
*यावेळी उपस्थित अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यावसायिक, भाजी विक्रेते, नागरिकांनी सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या.