ब्लॅक बेल्ट परीक्षेत कनेडी हायस्कूलचे सुयश

ब्लॅक बेल्ट परीक्षेत कनेडी हायस्कूलचे सुयश

*कोंकण Express*

*ब्लॅक बेल्ट परीक्षेत कनेडी हायस्कूलचे सुयश*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेत वार शनिवार व रविवार दिनांक-२७/०१/२०२४ आणि २८ /०१/२०२४ रोजी ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले*.

*सदर परीक्षा “INDO-RYO KARATE -DO & SPORT’S ASSOCIATION, India संस्थेमार्फत बॅल्क बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले. *संस्थेचे अध्यक्ष सन्मा.श्री. रविंद्र खामकर,परिक्षेचे परिक्षक श्री. सचिन महाडिक, श्री.गणेश हटकर, श्री.रंजन चव्हाण, स्नेहा रहाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत उच्च माध्यमिक विभागातील कु. सृष्टी जयवंत गुडेकर, कु.साक्षी शामसुंदर सावंत, कु. हेमांगी सुधाकर घाडीगांवकर, कु. प्रणाली प्रविण कांदळकर, कु. करिना किशोर सावंत,यांनी सुयश संपादन केले, या सर्व विद्यार्थ्यांनी इ.५ वी पासून कराटे प्रशिक्षक श्री. साई प्रसाद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले व घेत आहेत.*

*ब्लॅक बेल्ट ही कराटे मधील सर्वात महत्वाची परीक्षा समजली जाते, ही परीक्षा पास होण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, मानसिक तयारी व सामाजिक दृष्टीकोन यांची जाणिव असावी लागते, आणि त्याचे फलित म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले सुयश*

*या नेत्रदिपक सुयशाबद्दल सन्मा.श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) सन्मा.श्री.आर.एच.सावंत, (शालेय समिती चेअरमन), संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री. सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!