*कोकण Express*
*तिलारी धरणाचा खानयाळे येथील कालवा फुटला…*
येथील तिलारी धरणाचा उजवा तीर कालवा फुटल्याने नदीला पूर आला आहे. हा कालवा फुटल्याने चक्क ऐन उन्हाळ्यात पूर आला आहे. दरम्यान तिलारी विभागाचा मनमानी कारभार समोर येत असून निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तिलारी प्रकल्पाच्या डावा कालवा खानयाळे येथे आज दुपारी फुटून लाखो लिटर पाणी भेडशी येथिल आवाडे येळपईवाडी नदीला पूर येऊन दोडामार्ग तिलारी मार्ग वाहतुकीस बंद झाला.रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगच रांगच लागल्या होत्या.भर उन्हाळ्यात रस्त्यावर पूर आल्याने सर्व नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याने संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी दोडामार्ग शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.