*कोंकण Express*
*कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या बैठकित जिल्हा मेळाव्याचे नियोजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कास्ट्राईब शिक्षक संघटना मालवण तालुका बैठक टोपीवाला हायस्कूल मालवण येथे झाली या बैठकीमध्ये जिल्हा मेळावा नियोजना बाबत चर्चा करण्यात आली.कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या बाबतीमध्ये निर्माण केलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कास्ट्राईब शिक्षक संघटना ही एकमेव नोंदणीकृत संघटना आहे या संघटनेचे कामकाज संघटनेची घटना व नियम यानुसार चालते कास्ट्राईब नावाने इतर काही संघटना काम करतात त्या नोंदणीकृत नाहीत तसेच शासनमान्य सुद्धा नाहीत . कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना व नियम, सभासद यादी सादर करण्यात आली.तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेमधून श्री. कृष्णा इंगळे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. श्री.कृष्णा इंगळे यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. पुढील काळात ज्या अपप्रवृत्ती अपप्रचार करतायेत त्यांचा बंदोबस्त केला जाईल, तत्पूर्वी आपल्या शिक्षक बांधवांना संघटनात्मक भूमिका आणि कायदेशीर बाजू समजावून सांगितली जाईल. आजच्या बैठकीला मालवण तालुका अध्यक्ष विपिन ठाकूर ,संभाजी कोरे सर, मुख्याध्यापक सखाराम कांबळे, एस के कांबळे , भरत ठाकूर, एन.पी कांबळे , जिल्हाध्यक्ष सुनील घस्ती , राज्य कार्यकारणी सदस्य डॉक्टर पारस जाधव, ज्ञानेश्वर कुंबरे इत्यादी उपस्थित होते.