वामनराव महाडिक विद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रकाश घाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण

वामनराव महाडिक विद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रकाश घाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण

*कोंकण Express*

*वामनराव महाडिक विद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रकाश घाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथे प्रशालेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रकाश यशवंत घाडी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पंचायत स. कणकवलीचे माजी सभापती दिलिपभाई तळेकर,उपसरपंच शैलेश सुर्वे,शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडीक,सदस्य शरद वायंगणकर,प्रवीण वरूणकर, निलेश सोरप,उमेश कदम,संतोष जठार,प्राचार्य अविनाश मांजरेकर,माजी उपसरपंच दिनेश मुद्रस,माजी विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. प्रकाश घाडी हे गेले 37 वर्षे प्रशालेत प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत आहेत.31 मार्च 2024 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत,याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शाळा समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांनी एकमताने या गोष्टीसाठी सहमती दर्शविली. विद्यालयातील प्रत्येक कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून त्यांना मिळत असलेल्या समानतेच्या वागणुकीचे हे एक उत्तम उदाहरणच आहे असे म्हणावे लागेल. प्रशालेचे क्रीडा शिक्षक एन.बी.तडवी यांची एन.सी.सी. ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दलनागपूर(कामठी)येथे सैनिकी प्रशिक्षणासाठी रवाना होत असल्याने शाळा समिती व प्रशालेमार्फत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी कराटे शिक्षिका आर्या राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.ग्रामस्थ मिथिल डंबे यांच्याकडून मुलांना लाडू वाटप करण्यात आले. आणखीन उल्लेखनीय बाब म्हणजे याच दिवशी प्रशालेचे स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांनी सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे झालेल्या संचलनामध्ये सहभागी होऊन प्रशालेचे नाव उंचावले. याप्रसंगी स्काऊटचे शिक्षक डी.सी.तळेकर व पी.एन.काणेकर त्या ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!