*कोकण Express*
*शिवसेना नेते सतीश सावंत यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी वैभववाडी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा धार्मिक उपक्रम..*
*वैभववाडी श्री दत्तमंदिरात सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिवसेना नेते, सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी श्री दत्तमंदिर येथे त्यांना दिर्घआयुष्य लाभण्यासाठी अभिषेक करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, बँक संचालक दिगंबर पाटील, शहरप्रमुख प्रदीप रावराणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संभाजी रावराणे, उपतालुकाप्रमुख दिलीप नारकर, विभागप्रमुख विठोजी पाटील, लोरे उपसरपंच दीपक पाचकूडे, कोकिसरे उपसरपंच श्रीकांत डाफळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बंड्या सावंत, उपशहरप्रमुख सुनील रावराणे, उद्योगपती श्री. चव्हाण, पप्या पालांडे, खांबाळे ग्रा.प. सदस्य गणेश पवार, दत्तात्रय परब, सत्यवान सुतार, संजय निकम, बंड्या होळकर, कमलाकर सरवणकर, गोविंद जांभवडेकर, बाळा बोभाटे, प्रकाश चव्हाण, बाबुराव चव्हाण इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.