मुस्लिम मंच, सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग द्वारा नांदगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

मुस्लिम मंच, सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग द्वारा नांदगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

*कोंकण Express*

*मुस्लिम मंच, सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग द्वारा नांदगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तसाठ्याची टंचाई व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुस्लिम मंच, सिंधुदुर्ग व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव उर्दू शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्ह्याभरातून मुस्लिम समाजातील तरूणांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
रक्तदान शिबीरास सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेचे कणकवली तालुकाध्यक्ष श्री अमोल भोगले, सहसचिव सचिन जाधव तसेच जिल्हा रुग्णालय, नांदगांव उर्दूशाळा समिती व नांदगाव मुस्लीम समाजाचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी अहमद बटवाले, निसार शेख, मुरादअली शेख, एड. आश्पाक शेख, शानू शहा, एड. रईस पटेल, निसार काझी, मजिद बटवाले, रज्जब रमदुल, मुदस्सर मुकादम, ईमाम नावलेकर, जावेद पाटणकर, अल्लाउद्दीन बोबडे, शकिल बटवाले, रौनक पटेल इत्यादी मान्यवर व संस्थेचे इतर बरेच सदस्य उपस्थित होते.
अशाच प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम यापुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येतील असं मत मुस्लिम मंच, सिंधुदुर्ग च्या सदस्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!